Header Ads

Header ADS

मोठी बातमी! बारामतीच्या निंबुत शर्यतीचा बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी

 



मोठी बातमी! बारामतीच्या निंबुत शर्यतीचा बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी

लेवाजगत न्युज बारामती:- बारामतीच्या (Baramati News) निंबूत (Nimbut Village) इथे गोळीबार (Firing) झाला. शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून काल रात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. रणजीत निंबाळकर बैल परत आणायला गेले असताना गोळीबार झाला, ज्यात निंबाळकर जखमी झाले आहेत.

बारामतीच्या (Baramati Crime News) निंबुतमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून झाला गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बैल परत आणण्यासाठी निंबाळकर गेले होते. त्यावेळी वाद झाला आणि याच वादातून त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबारात रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले आहेत. काल (गुरुवारी) रात्री उशीरा गोळीबार झाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.