Header Ads

Header ADS

बहिणाबाई साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न अध्यक्ष प्रा. किसन वराडे तर कार्यध्यक्ष सुनील इंगळे

 

Bahinabai-Sahitya-Consida-general-meeting-past-president- Prof. Kisan Varade-while-working-president- Sunil-Ingle

बहिणाबाई साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न अध्यक्ष प्रा. किसन वराडे तर कार्यध्यक्ष सुनील इंगळे

Bahinabai-Sahitya-Consida-general-meeting-past-president- Prof. Kisan Varade-while-working-president- Sunil-Ingle


 लेवाजगत न्यूज अंबरनाथ : बहिणाबाई साहित्य परिषदेची एकोणिसावी सर्वसाधारण सभा नुकतीच अंबरनाथ येथील श्री. किसन वराडे सर यांच्या 'सुगी' या बंगल्यावर आयोजित केली होती. सभेला जेष्ठ साहित्यिक नि.रा.पाटील,किसन वराडे, डॉ.चंद्रशेखर भारती, पत्रकार व समाजसेवक सुनील इंगळे, कवी लीलाधर महाजन, प्रल्हाद कोलते, मोहन वायकोळे, रमेश तारमळे, पुष्पा कोल्हे, कुंदा झोपे, नरेंद्र राणे, लता पाटील, गोपाळ सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

   साहित्यिक नि.रा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै.प्रा.राम नेमाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व सभासदांच्या संमतीने व बहुमताने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर प्राध्यापक श्री.किसन वराडे यांची सर्व संमतीने व एकमताने निवड करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रशेखर भारती, कार्याध्यक्षपदी सुनील इंगळे, कोषाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहकोषाध्यक्ष मोहन वायकोळे, कार्यवाहक लीलाधर महाजन, सहकार्यवाहक प्रल्हाद कोलते तर कार्यकारणी सदस्य पदी सौ.लता पाटील,सौ.आरती मुळे, श्रीमती पुष्पा कोल्हे, श्री. प्रदीप कासुर्डे, श्री. हेमंत नेहते,श्री.रमेश तारमळे तर सल्लागारपदी ज्येष्ठ साहित्यिक नि.रा.पाटील हे पुढील पाच वर्ष कार्यरत राहतील असे जाहीर करण्यात आले. काव्यकन्या,खानदेशकन्या बहिणाबाई चौधरींचें काव्य, त्या काव्यातील साहित्य तळागाळात पोहोचवण्याचा संकल्प करून विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आलेत.

   याप्रसंगी प्राध्यापक किसन वराडे  यांनी स्वलिखित आत्मकथन 'सरवा' उपस्थित सर्वांना भेट दिले.

   यावेळी प्राध्यापक किसन वराडे यांनी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देऊन उपस्थिततांना तृप्त केले त्याबद्दल त्यांचे आभार मानून सभेची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.