Header Ads

Header ADS

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

 

BJP-senior-leader-LK-Advani-in-hospital-admitted-condition-stable

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

लेवाजगत न्यूज नवी दिल्ली-भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षांच्या आडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

BJP-senior-leader-LK-Advani-in-hospital-admitted-condition-stable


    तीन महिन्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती जगदीप धनकड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

    लालकृष्ण अडवाणी यांनी जून २००२ ते मे २००४ या काळात देशाचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. तसेच ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ या काळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. तसेच भाजपा संघटनेसाठीही त्यांनी वेळोवेळी योगदान दिले होते. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.