Header Ads

Header ADS

सहा वर्षाचा चिमुकलीवर जामनेर तालुक्यात अत्याचार करून केला खून

A six-year-old-child-was-killed-by-torture-in-Jamner-Taluka.
                         (संग्रहित पोटो )
    

सहा वर्षाचा चिमुकलीवर जामनेर तालुक्यात अत्याचार करून केला खून

लेवाजगत न्यूज जामनेर -तालुक्यातील केकतनिंभोरा गावात राहणाऱ्या एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ११ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे.

    या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे ६ वर्षे चिमुकली आपले आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती. दरम्यान गावात राहणारा एकाने याने पीडित मुलीला तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला. त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. दुसरीकडे दुपारी ४ वाजेपासून मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केली, अखेर रात्री ११ वाजता तिचा मृतदेह चिंचखेडा शिवारातील इंदासी माता मंदिरा जवळील केळीच्या शेतात तिचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला, तिच्या तोंडावर तसेच गळ्यावर जखमा दिसून आल्याने तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे दिसून झाले.

   जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान अत्याचार करणाऱ्या नराधरामाला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. मयत मुलीच्या पश्चात आई-वडील एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

   दरम्यान जोपर्यंत नराधमाला अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र मुलीच्या नातेवाईकांनी घेतला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी असल्याचे पाहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.