Header Ads

Header ADS

१८ वर्षीय युवकावर के-हाळे येथे विळ्याने हल्ला

18-year-old-youth-was-attacked-with-a-knife-at-K-Hale


१८ वर्षीय युवकावर के-हाळे येथे विळ्याने हल्ला

लेवाजगत न्यूज रावेर-किरकोळ कारणावरून मजुरांच्या वादात एकाने विळ्याने वार करून एका युवकास गंभीर जखमी केल्याची घटना काल रोजी तालुक्यातील के-हाळे येथे घडलीआहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सात जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

      याबाबतचे वृत्त असे की केऱ्हाळे येथील प्रिंपी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरलेल्या वाहनाचा वजन काट्यावर आधि वजन करण्याच्या कारणावरून विकी यशवंत वाघ रा .आहिरवाडी व रियाज रफिक तडवी यांच्यात वाद झाला . हा वाद वाढत जाऊन विकी याने रियाज (वय १८) यास मानेवर विळ्याने मारून प्राणघातक हल्ला केला . तसेच गणेश देविदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव, मंगल पाटील यांनी फिर्यादी सबदर तडवी व रियाज यास चापटा बुक्यांनी मारहाण केली . या बाबत सबदर हैदर तडवी रा . भोकरी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास उपनिरिक्षक तुषार पाटील करीत आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.