Header Ads

Header ADS

क्रिकेट खेळताना तरुणाला हृदविकाराचा झटका येऊन मृत्यू,पीडब्ल्यूडी मैदानावरचा सामना ठरला अखेरचा

 

Youth-Dies-of-Heart-Attack-While-Playing-Cricket

क्रिकेट खेळताना तरुणाला हृदविकाराचा झटका येऊन मृत्यू,पीडब्ल्यूडी मैदानावरचा सामना ठरला अखेरचा

पिंपरी चिंचवड-मधील सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट खेणाऱ्या ४० वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळत असताना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मिलिंद भोंडवे अस मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोलंदाजी करत असताना अचानक तरुण खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एक च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी च्या पिडब्ल्यूडी मैदानावर पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. आज तिसरा दिवस होता.

      आज दुपारी मिलिंद यांच्या टीम चा क्रिकेट सामना होता, ते स्वतः देखील गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मैदानावर कोसळले. इतर सहकारी खेळाडू यांनी धावत येऊन त्यांना नेमकं काय झालं हे पाहिलं. मिलिंद यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचा मृत्यू हा हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे. मिलिंद हे उत्तम क्रिकेट खेळायचे. त्यांचा हा क्रिकेट चा सामना शेवट चा असेल त्यांना वाटले नव्हते. मावळ तालुक्यातील दारुब्रे येथील ते मूळ राहणारे आहेत. या घटनेमुळे भोंडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.