Header Ads

Header ADS

तापी नदी पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

 

Youth commits suicide by jumping from Tapi river bridge

तापी नदी पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

लेवाजगत न्यूज यावल-तालुक्यातील विरावली येथील तरुणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी  पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विरावली ता. यावल येथील रहिवासी शंकर मदन रल (वय ३५) याने तापी नदीच्या पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुचाकीवरून शंकर रल यांच्या कुटुंबास माहिती दिली. तेव्हा घटनास्थळी रल यांच्या नातलगांनी जावून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. येथे डॉ. तुषार सोनवणे, डॉ. सौरव भुताने यांनी तपासणी करून रल यास मृत घोषीत केले. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार संदीप आला सूर्यवंशी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.