Header Ads

Header ADS

जुन्या वादातून खून, कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

 

While-sitting-in-car-shot-by-ignorant-assailants-killed-from-an-old-argument

कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या ,जुन्या वादातून खून

लेवाजगत न्यूज भुसावळ  : भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. महामार्गांवरील जुन्या रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा खून झाला असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथं डाक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी फरार संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत. दोघ मयत यांना जळगाव शासकीय महाविद्यालय येथे शवच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.