Header Ads

Header ADS

उटखेडा येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

Utkheda-youth-by-hanging-committing-suicide-Raver- police-record-of-sudden-death


 उटखेडा येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

लेवाजगत न्यूज रावेर-रावेर तालुक्यातील उटखेडा येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

  आज सकाळी उटखेडा येथील योगेश रमेश बारी( वय ३५) याने त्याच्या रहाते घरात छताच्या लाकडी बल्लीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत निलेश बारी यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सतिश सानप करित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.