घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन माध्यप्रदेशतील चोरट्यांना अटक;यावल पोलीसांची कामगिरी
घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन माध्यप्रदेशतील चोरट्यांना अटक;यावल पोलीसांची कामगिरी
वृत्तसंस्था यावल- यावल तालुक्यातील वढोदा येथील घरफोडी तरून दोन लाख रूपयांचा ऐवज लांबविणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक करण्यात यावल पोलीसांना यश आले आहे.
याबाबत अधिक असे की, यावल तालुक्यातील वढोदा येथे राहणारे प्रदीप दिनकर सपकाळे रिक्षा चालक यांच्या घरात २८ व २९ एप्रील रोजीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सपकाळे कुटुंब हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचे दागीन्यांसह मोबाईल असे एकूण २ लाख २४ हजारांचा रूपयांचे मुद्देमाल चोरून पसार झाल्याची घटना उघडकीस आली होती.
दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधकामी यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ किरण धनगर यांच्यासह पोलीसांच्या पथकाने वेगाने शोध कार्य केल्याने या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत संशयित आरोपी रेवलसिंग उर्फ सावन गुलसिंग बारेला वय-२८, रा. जामन्या ता. भगवानपुरा जि.खरगोन व मेगलासिंग उर्फ सेवकराम दलसिंग सोलंकी वय-३० वर्ष रा. बोकरान्या ता. भगवानपुरा जि. खरगोन या दोघांना अटक करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत