मुलाखतीला गेलेल्या तरुणासह दोघे बेपत्ता
मुलाखतीला गेलेल्या तरुणासह दोघे बेपत्ता
प्रतिनिधी जळगाव-शहरातून इंदूर येथे नोकरीच्या मुलाखतीला जातो असे सांगून गेलेल्या तरुणासह दोन जण २५ दिवसात बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी व रामानंद नगर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद झाली आहे. हर्षल दिलीप चौधरी (वय ३५, रा. भगवान नगर, खेडी) हा तरुण २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता इंदूर येथे मुलाखतीसाठी जातो असे सांगून गेला तो अद्याप परत आलेला नाही. अशी तक्रार त्याचा भाऊ सागर चौधरी याने दिली. त्यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद झाली आहे. तसेच कोल्हे नगरातील जितेंद्र भगवान पाटील (वय २५) हा तरुण १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घरात कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत