पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीला एका तासात ठोकल्या बेड्या
पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीला एका तासात ठोकल्या बेड्या
वृत्तसंस्था जळगाव-चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथील पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला मेहुणबारे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत तासाभरात अटक केली. मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे डिवीजन नाईट राऊंड गस्तीला होते. रोहिणी गावातील नाकाबंदी पोस्ट जवळ अचानक दोन मोटारसायकली त्यांच्या गाडी जवळ येऊन थांबल्या आणि त्यातील एकाने सांगितले की, एक इसम त्याच्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या करून चाळीसगावच्या दिशेने पसार झाला आहे. माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी व चालक संजय पाटील यांनी त्या मुलांना गाडीत बसवुन आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. पथकाने सर्च ऑपरेशन केले असता संशयित हा हिरापूर गावाच्या रस्त्यालगत मिळून आला. त्याला पथकाने ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. संशयित आरोपी
कैलास गायकवाड हा चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील असून हा सासरवाडीला रोहिणी येथे गेला होता. तेथे त्याने खून केला अशी माहिती समोर आली आहे. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेमधील आरोपीला एक तासात अटक केल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत