Header Ads

Header ADS

तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त


 तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त 


 लेवाजगत न्युज नंदुरबार:- 

लोकसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरु असतांना काही भागात मतदान देखील झाले आहे. याच काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा अमली पदार्थ आणि त्यासाठी वापरले जाणारी १ कोटी ३७ लाख रुपयांची वाहने जप्त केली आहे. या दरम्यान ४ हजाराहून अधिक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमा भागावर आहे. या कारणाने गुन्हेगारांवर वचक ठेवणे. यासोबतच दारू, गांजा आणि अवैद्य शस्त्र यासोबतच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या अनुषंगाने पोलिसांनी नजर ठेवण्यासाठी निवडणुकीच्या काळात सीमावरती भागांमध्ये २६ तपासणी नाके तयार करण्यात आले होते. आचारसंहितेच्या काळात तपासणी नाक्यांवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करत कारवाई केली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलीस दलाने कारवाई करत तब्बल १ कोटींची दारू, ७५ लाखांचा गुटखा, यासोबतच ६० हजारांचा गांजा आणि सव्वा कोटींची एकूण 64 वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत एकूण ४ हजार जणांवर गुन्हा दाखल निवडणुकीचा काळात करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.