Header Ads

Header ADS

समाजमाध्यमात फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत अत्याचार : मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकाराने खळबळ

 

Social-media-photo-viral-threat-to-give-atrocities- in Muktainagar-taluka- kind of-commotion

समाजमाध्यमात फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत अत्याचार : मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकाराने खळबळ

लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर-फोटो एडिट करून समाजमाध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित तरूणीवर अत्याचार करणार्‍याचा धक्कादायक प्रकार घडला असून या आरोपीच्या विरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या संदर्भात वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात रहिवास असलेल्या २१ वर्षाच्या तरूणीने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, आसीफ मुश्ताक खाटीक या तरूणाची समोरच्या घरात वास्तव्यास असलेल्या तरूणीच्या नणंदेला बहिण मानत असे. यामुळे त्यांच्या घरात आसीफचे येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने त्या विवाहित महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क वाढविला. यानंतर त्याने काही फोटो काढले. हे फोटो एडिट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी तो त्या विवाहित महिलेला देऊ लागला. यातून धमकी देत त्याने १७ एप्रिल आणि २८ एप्रिल रोजी बळजबरी करून शारीरीक अत्याचार केले.


यानंतर, तो पुन्हा धमक्या देऊ लागला. दिनांक ३ मे २०२४ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आसीफ खाटीक हा या महिलेच्या घरी येऊन बळजबरी करू लागला. याप्रसंगी विवाहितेचे कुटुंबिय जागी झाल्याने तो पळून गेला. या महिलेच्या कुटुंबियांनी तिला विश्‍वासात घेऊन सर्व माहिती जाणून घेतली. यानंतर आसीफ मुश्ताक खाटीक याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.