Header Ads

Header ADS

श्रीराम पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर वॉटर कुलरचा शॉक लागल्याने पाणीपुरी विक्रेता ठार

Shriram-Petroleum's-Panipuri-seller-was-killed-after-shock-of-water-cooler-on-petrol-pump.


श्रीराम पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर वॉटर कुलरचा शॉक लागल्याने पाणीपुरी विक्रेता ठार

वृत्तसंस्था रावेर-येथे थंड पाण्याचा मोह एका २६ वर्षीय पाणीपुरी विक्रेत्या तरुणाच्या जीवावर बेतला. श्रीराम पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर वॉटर कुलरचा शॉक लागून त्याला जीव गमवावा लागला. रावेर शहरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

    मध्य प्रदेशातील सुजालपुरा, ता.लहार, जि.भिंड येथील रहिवासी धृपकुमार चरणसिंग कुशवाह (वय २६, ह.मु.सावदा रोड, श्रीकृष्ण नगर, रावेर) याचा बऱ्हाणपूर रोडवरील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धृपकुमार पेट्रोल पंपावर थंड पाणी आणण्यासाठी गेला. वॉटरकुलरचा शॉक लागून तो खाली कोसळला. भाऊ शिवम व इतरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल नेले.

    वर्दळ असलेले ठिकाण धृपकुमारचा ज्या वॉटरकुलरचा शॉक लागून मृत्यू झाला, त्या घटनास्थळाच्या बाजूला लक्झरी थांबा आहे. तेथे दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनेकांची वर्दळ असते. अनेक जण पाणी पिण्यासाठी येतात. सुदैवाने या घटनेवेळी तेथे गर्दी नव्हती.

    पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. पाच सहा वर्षांपूर्वी त्याचे आई-वडील, भाऊ रावेर येथे उदरनिर्वाहासाठी येथे आले होते. वर्षभरापूर्वी धूपकुमार याचा विवाह झाला होता. घटनेची माहिती मिळताच भैय्या धोबी, बाळा आमोदकर, गजानन पाटील, प्रवीण चौधरी यांनी मदतीसाठी धाव घेतली. भाऊ शिवम कुशवाह याच्या खबरीवरून रावेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास उपनिरीक्षक ईस्माईल शेख करत आहेत. डॉ. वीरेंद्र काटकर यांनी शवविच्छेदन केले. यानंतर मृतदेह मूळगावी नेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.