शिक्षक भरतीवरील निर्बंधही हटवले; प्रक्रिया लवकर सुरू
शिक्षक भरतीवरील निर्बंधही हटवले; प्रक्रिया लवकर सुरू
वृत्तसंस्था धुळे-राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा आचारसंहिता लागू झाल्यामुळे निर्बंध आले होते; परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार आहे.
नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी शासनाला प्राप्त झाली आहे. त्या-त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की त्या जिल्ह्यात नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. पवित्र पोर्टल मार्फत २५ फेब्रुवारी रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीबाबत विविध प्रक्रिया करून ठेवली आहे.
निवडणूक आयोगाचे शिक्षण आयुक्त कार्यालयास पत्र
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. या विषयीची तातडीचे तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे, असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत