Header Ads

Header ADS

राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदानही महत्त्वाचे-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

 

Senior social worker Dr. Rabindra Bhole is also important to preserve the nation's civilized heritage.

राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदानही महत्त्वाचे-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे 

लेवाजगत न्यूज दौंड बोरीऐंदी :-नास्तिकतेमुळे धर्माचे अधःपतन होते तर आस्तिकतेमुळे धर्म जागविला जातो. धर्म धारणा करण्यासाठी धर्माचरण महत्त्वाचे असते. यासाठी मनुष्याने यज्ञ ,दान , तप कर्म केले पाहिजे, असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये उद्बोधन केलेले आहे. यज्ञ, दान ,तप ,कर्म ह्याशिवाय कलियुगामध्ये दानालाl खूप महत्त्व आले आहे. गोदान ,भूदान, कन्यादान ,वस्त्रदान ,अन्नदान, हे दान जीवनामध्ये प्रत्येक सत्पुरुषाने केले पाहिजे. याशिवाय लोकशाहीत मतदानाला खूपच महत्त्व आले असून राष्ट्राचा सदृढ व सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदान ही श्रेष्ठ दान आहे. हक्क मागताना कर्तव्याची जाणीव ठेवणे महत्वाचे असून राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा टिकवण्यासाठी मतदान महत्त्वाचे आहे ,असे मत जेष्ठ समाजसेवक हभप डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे प्रवचनात व्यक्त केले. बोरीऐंदी येथे अखंड हरिनाम सप्ताह व येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथा पारायण सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी उरुळी कांचन येथील जेष्ठ समाजसेवक हभप डॉ.रवींद्र भोळे यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले .यापुढे ते प्रवचनात म्हणाले की बोरी ऐंदी येथे समस्त   गावकरी भाविक भक्त यांच्याकृपा आशीर्वादामुळे  आयोजित करण्यात आलेले हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथा पारायण सोहळ्याचे हे सत्ताविसावे वर्ष आहे, या कालावधीमध्ये अनेक संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार ,प्रबोधनकार यांनी येथे येऊन भाविक, भक्तांना मार्गदर्शन केले ते सर्व कौतुकास पात्र आहेत. साधू संत ह्यांच्या पदस्पर्शाने बोरमल नाथ मंदिर भूमी पवित्र झाली आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सर्वस्वी ह भ प प्रवचनकार चंद्रकांत महाराज वेदपाठक( बोरी ), ह भ प मोटे महाराज (यवत) ,ह भ प काळे महाराज सर (नांदूर), ह भ प दशरथ महाराज इंदलकर (वाघापूर), ह भ प मनोज महाराज वाघले (पोंढे), ह भ प वंदना महाराज काकडे (थेऊर), ह भ प हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे महाराज (उरुळी कांचन) यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सर्व श्री ह भ प कीर्तनकार ह भ प संतोष महाराज भागवत (नाथाची वाडी), ह भ प सानिकाताई महाराज झेंडे (दिवे), ह भ प राणीताई महाराज कोलते( वढाणे), ह भ प बबन महाराज वेदपाठक (बोरी ऐंदीं), ह भ प गणेश महाराज वाघाले (पोंढे), ह भ प गणेश महाराज आखाडे (कासुर्डी), ह भ प शंकर महाराज झाडे( उस्मानाबाद )ह्यांची  कीर्तने झालीत. त्याचप्रमाणे सकाळी सात वाजता नाथांची पालखी मिरवणूक व ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी प्रदक्षिणा होऊन काल्याचे किर्तन ह भ प दिगंबर महाराज जाधव (राहू )यांचे झाले. याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्त यांना महाप्रसाद महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठ नेतृत्व मार्गदर्शक ह भ प भवन महाराज वेदपाठक, ह भ प जनार्दन आप्पा वाबळे (सासवड) यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे व्यवस्थापन ह भ प गणेश शिवाजी दौंडकर व्यवस्थापक अध्यक्ष ह्यांनी केले . कार्यक्रमाचे आयोजन  ह भ प गाथा भजनी मंडळ वाडी, वस्ती  समस्त ग्रामस्थ वाडी वस्तीसह बोरी ऐंदी  ह्यांनी केले.बोरमलनाथ मंदिर येथे या अखंड हरिनाम सप्ताहाचे व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायनाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड सप्ताह मध्ये गावकरी, भाविक भक्त ,अनेक मान्यवर ,कीर्तनकार प्रवचनकार, पंचक्रोशीतील अनेक वारकरी,गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.