Header Ads

Header ADS

कामगारांचा किंवा नागरिकांचा उष्माघातापासून जीव वाचवण्यासाठी कलम १४४ लागू-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

 

Section-144-applied-District-Magistrate-Ayush-Prasad to save-life-of-workers-or-citizens-from-heatstroke

कामगारांचा किंवा नागरिकांचा उष्माघातापासून जीव वाचवण्यासाठी कलम १४४ लागू-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद 

लेवाजगत न्यूज जळगाव- दि-२५मे, हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात येत्या आठवडाभर ४५° ते ४७° इतके मानवी शरीराला उष्माघात होऊ शकणारे उच्च तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अंगमेहनतीच्या खुल्या जागेतील किंवा पत्री शेडच्या कामाठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा किंवा नागरिकांचा उष्माघातापासून जीव वाचवण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलेलं आहे. औद्योगिक वसाहतीत काही ठिकाणी दिनांक २५ मे ते ०३ जूनपर्यंत कामाच्या ठिकाणी दुपारी १२ ते ०४ या वेळेत असल्याने अशा ठिकाणी उष्माघातापासून कामगारांचे संरक्षण करण्यासाठी संबंधित कारखाने किंवा आस्थापनांची जबाबदारी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांना औद्योगिक कंपन्या आणि कारखाने किंवा पत्री शेडमध्ये चालणारे लघुउद्योग यांना याबाबत सहकार्य करण्याचे अधिकार आहेत. कामाचे ठेकेदार किंवा कंपनी व्यवस्थापनाने सदरील कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कामगारांसाठी पंखे किंवा कुलरची व्यवस्था करणे तसेच पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे अशा गोष्टी करावयाच्या आहेत. आता लागू केलेले कलम १४४ म्हणजे लॉकडाऊन किंवा नागरिकांचा नेहमीप्रमाणे समुहाने मुक्त संचार करण्यावर निर्बंध घातले आहे, असा होत नाही. त्यामुळे जमावबंदी लागू झाली असा कोणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.