Header Ads

Header ADS

सावदा पालिका संचलित हायस्कूल बारावी विज्ञान शाखेत महाजन दूर्वा तर कला शाखेत पाटील हर्षदा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

सावदा पालिका संचलित हायस्कूल बारावी


 सावदा पालिका संचलित हायस्कूल बारावी विज्ञान शाखेत महाजन दूर्वा तर कला शाखेत पाटील हर्षदा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

लेवा जगत न्यूज सावदा-येथील नगरपालिका संचलित श्री.आ.गं.हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२४ चा निकाल दिनांक २१ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला या निकालात इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक महाजन दूर्वा सुनील या विद्यार्थिनी ५३० गुण मिळवून ८८.३३% मार्क मिळवले आहे तर द्वितीय क्रमांक भारंबे भावेश महेश यांनी ५०२ गुण मिळवून ८३.६७% तर कला शाखेत प्रथम क्रमांक पाटील हर्षदा नरेश एकूण ४४० गुण ७३.३३% तर द्वितीय क्रमांक चौधरी भारती पंढरीनाथ यांना एकूण गुण ४०८ मिळवले असून ६८% असे विद्यार्थी प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. असून यावर्षी शाळेत बारावी विज्ञान परीक्षेसाठी १२८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शेकडा ९९.२१% निकाल लागला असून कला शाखेचा निकाल ७७.१४% टक्के लागला असून बारावी कला शाखेत १०५ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असे एकूण २३३ विद्यार्थ्यांपैकी २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे  मुख्याधिकारी  भूषण वर्मा व मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.