सप्तशृंग गडावरुन उडी घेत प्रेमीयुगलाची आत्महत्या
सप्तशृंग गडावरुन उडी घेत प्रेमीयुगलाची आत्महत्या
नाशिक – जिल्ह्यातील सप्तश्रृंग गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेत युवक आणि अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली.
सप्तशृंगी गडावर मंगेश शिंदे (२४, रा. भायाळे) आणि प्रियंका तिडके (१६, रा. वडनेरभैरव) हे दुचाकीने दिंडोरीहून २८ एप्रिल रोजी आले होते. शीतकड्यावरुन उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह झाडाला अडकलेला तर, युवकाचा मृतदेह दरीत आढळला. या घटनेस सहा दिवस झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. गुराख्यांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी भातोडेचे पोलीस पाटील विजय चव्हा यांना माहिती दिली. त्यानंतर वणी पोलिसांना कळविण्यात आले. वणी पोलीस स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेहांपर्यंत पोहोचले. दोघांचे प्रेम प्रकरण असल्याची प्राथमिक माहिती असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत