Header Ads

Header ADS

रोटाव्हेटरमध्ये जोडणी करतांना ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

रोटाव्हेटरमध्ये जोडणी करतांना ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू


 रोटाव्हेटरमध्ये जोडणी करतांना ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

लेवाजगत न्यूज सावदाः- ट्रॅक्टरला रोटाव्हीटर जोडत असतांना ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने यशवंत हेमचंद्र धांडे (वय ५७, रा. चिनावल) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि. १२ मे रोजी चिनावल येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

    रावेर तालुक्यातील चिनावल गावातील यशवंत धांडे हे शेतकरी असून ते शेतात आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टरला रोटाव्हिटरची जोडणी करीत होते. यावेळी धांडे यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर गेल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले. ही घटना शेतातील इतरांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ गावातील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे चिनावल व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.