रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी कटिबद्ध - श्रीराम पाटील
रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी कटिबद्ध -श्रीराम पाटील
लेवाजगत प्रतिनिधी रावेर - रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात रस्त्यांचे जाळे आधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान सडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करू असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले. रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे( शरदचंद्र पवार ) उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारासाठी रावेर तालुक्यातून आदिवासी पट्ट्यात आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार शिरीष चौधरी यांनी पूर्ण दिवसभर तळपत्या उन्हाची पर्वा न करता या प्रचार रॅलीत सहभाग घेतला. सुरुवातीला सकाळी उमेदवार श्रीराम पाटील, आमदार शिरीष चौधरी, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, दारा मोहम्मद जफर मोहम्मद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि प्रचार फेरीला सुरुवात झाली. बक्षीपुर रसलपूर, रमजीपुर आणि खिरोदा ( प्र यावल ),अभोडा बुद्रुक, अभोडा खुर्द, ताड जिन्सी, जिन्सी, मोरव्हाल, गुलाबवाडी, पाल, गारखेडा या गावात सुवासिनींनी ठिकठिकाणी ओवाळून उमेदवार श्रीराम पाटील यांचे स्वागत केले. 'श्रीराम पाटील आगे बढो - हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी युवकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी युवा नेते धनंजय चौधरी, राजीव सवर्णे, दिलरुबाब तडवी, लक्ष्मण मोपारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, सुभाष वानखेडे, मेहमूद शेख, शीतल पाटील, दीपक पाटील, सादिक शेख, असद मेंबर, संतोष पाटील, यशवंत महाजन, हनिफ पहलवान, माजी सरपंच कल्लू पैलवान, निकेत नाईक, मोरव्हालचे उस्मान तडवी, सरफराज तडवी, हनिफा तडवी, पाल येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हमीद भाई तडवी, कामील तडवी, रौनक तडवी, संजय पवार, गणेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील राम मंदिर, दुर्गा मंदिर,हनुमान मंदिर आदी ठिकाणी जाऊनही उमेदवार श्रीराम पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी बक्षीपुर, रसलपुर, खिरोदा प्र यावल, आणि रमजीपूर,पाल येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत