Header Ads

Header ADS

रेल्वेलाईन ओलांडता रेल्वेच्या धडकेने वाघोडच्या युवकाचा मृत्यू

Railway-line-crossing- train-hit-by-tiger- youth-death


रेल्वेलाईन ओलांडता रेल्वेच्या धडकेने वाघोडच्या युवकाचा मृत्यू

लेवाजगत न्यूज रावेर-रेल्वे लाईन ओलाडुन येत असतांना रेल्वे गाडीची जोरात धडक बसल्याने तालुक्यातील वाघोड येथील युवकाचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद रावेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

   या बाबतचे वृत्त असे की मंगळवारी रात्री साडे सात वाजेचे सुमारास वाघोड येथील दिपक संतोष महाजन (वय ३३) हा शौचालयास रेल्वे लाईन ओलांडून गेला होता. परत येत असतांना अप लाईन कडून अचानक आलेल्या रेल्वेची धडक बसल्याने तो बाजुला फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ बऱ्हाणपूर येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला . येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत जितेंद्र महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितिन आमोदकर करीत आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.