Header Ads

Header ADS

जुगार अड्डयावर सावदा येथे छापा : नऊ जणांविरूध्द कार्यवाही

Proceedings against nine persons raided at gambling den in Savada


जुगार अड्डयावर सावदा येथे छापा : नऊ जणांविरूध्द कार्यवाही

लेवाजगत न्यूज सावदा- शहरातील बस स्थानकाच्या मागील बाजूला सुरू असलेल्या पत्र्याच्या शेड मागील जुगार अड्डयावर सावदा  पोलिसांनी रेड टाकून नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

     या संदर्भातील माहिती अशी की, सावदा शहरातील बस स्थानक  मागील बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती सावदा पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने सावदा पोलिसांच्या पथकाने काल शनिवार दुपारी ३वाजता  येथे छापा टाकला.

   या छाप्यामध्ये संजय लक्ष्मण चौधरी ( वय ५०, रा. स्वामीनारायण नगर, सावदा ); रोहित चंद्रकांत सन्यास ( वय २३, रा. आंबेडकर नगर, सावदा ); अस्लम रशीद तडवी ( वय ४२, रा. काझीपुरा, सावदा ); सुनील धनराज चौधरी ( वय ४३, रा. भोईवाडा, सावदा ); अशोक प्रल्हाद खुर्दे ( रा. विवरा, ता. रावेर ); संदीप कोळी ( रा. कोचूर); विशाल कोळी (  शेख उर्फ इम्मो (रा. बडा आखाडा, सावदा ) यांच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक २५ रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.

 या कारवाईत ११२५० रूपये रोख, चार मोटारसायकली आणि चार मोबाईल असा एकूण अंदाजे २ लाख १२ हजार ७०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.