Header Ads

Header ADS

आज मुंबईमध्ये होणार पंतप्रधान यांचा रोड शो

Prime-Minister's-road-show-will-be-held-in- Mumbai-today


 आज मुंबईमध्ये होणार पंतप्रधान यांचा रोड शो

लेवाजगत न्यूज मुंबई- आज १५ मे रोजी मुंबईमध्ये सायकांळी सहा वाजून तीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. हा रोड शो ईशान्य मुंबई मतदारसंघात होणार आहे. हा रोड शो पावणे आठ वाजता संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.

आपण सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी जरूर यावे असं सांगत विकासपुरुष आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी येण्याचे आवाहन ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी केले आहे. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.