Header Ads

Header ADS

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; तज्ञांच्या उपस्थितीत होणार पाहणी



 पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; तज्ञांच्या उपस्थितीत होणार पाहणी


 लेवाजगत न्युज पंढरपूर:-श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. हे काम सुरु असताना मंदिराच्या हनुमान गेट जवळ फरशीचे काम करीत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे आढळून आले आहे. 

या तळघरात अंधार असल्याने स्पष्ट असे काही दिसत नाही, मात्र खोली पाच ते सहा फूट खोल आहे या खोलीत मूर्ती सदृश्य वस्तू दिसते. या तळघरात नेमकं काय आहे हे तळघर केव्हाच आहे याविषयी तज्ञाकडून माहिती घेतली जात आहे.(pandharpur)


मंदिराचे पूर्वापार पूजा अर्चा करणारे बडवे आणि उत्पात, पुजारी मंडळी यांचे कडून माहिती घेतली जात आहे. धर्म विरोधी आक्रमणा पासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती सुरक्षित स्थळी हलविली जात होती. त्यासाठीचे हे तळघर आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे.(shree vitthal mandir pandharpur)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.