Header Ads

Header ADS

जुन्या वादातून तरुणाचा खून; कालिंका माता चौक परिसरातील हॉटेलमधील रात्री १०.४५ वाजेची घटना; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फुटेज चित्रित

 

Old-dispute-murder-of-youth-incident-in-a-hotel-at-Kalinka-Mata-Chowk-area-at-10-45-pm-incident-filmed-in-cctv-camera-footage

जुन्या वादातून तरुणाचा खून; कालिंका माता चौक परिसरातील हॉटेलमधील रात्री १०.४५ वाजेची घटना; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फुटेज चित्रित

लेवाजगत न्यूज जळगाव-जुन्या वादातून कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे बुधवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना घडली. हा सर्व किशोर सोनवणे प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाल्याने त्यावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मृतदेह जीएमसीत हलवल्यानंतर नातेवाइकांसह मृताच्या मित्रांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे रात्री ११.३० ते १.२५ वाजेपर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

     किशोर अशोक सोनवणे (वय ३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. किशोरच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार किशोरचा सायंकाळी कालिंका माता मंदिर परिसरात एका चायनीज विक्रेत्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर तो रात्री कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये काही तरुणांनी त्याच्याशी जुन्या वादातून बराचवेळ वाद घातला. काही वेळानंतर वाद शांत झाला. त्यानंतर पुन्हा वाद उकरून काही तरुणांनी किशोरवर हल्ला चढवला. लाकडी दांड्याने मारहाण व धारदार शस्त्राने सात ते आठ वार झाल्यामुळे किशोर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जीएमसीत हलवण्यात आला. दरम्यान, वादाचा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यावरून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. उर्वरित मारेकरी पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेतआहे.

  रात्री १.२५ पर्यंत जीएमसीत तणाव

किशोरचा मृतदेह जीएमसीत आणल्यावर रात्री ११.३० वाजता प्रचंड गर्दी झाली होती. पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नीने रुग्णालयात धाव घेतली. भावाच्या मृत्यूमुळे बहिणीला देखील धक्का बसला. रात्री १.२५ वाजेपर्यंत रुग्णालयात गर्दी होती. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.