मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले चोपड्यातील श्रीराम पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवार बरसले
मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले चोपड्यातील श्रीराम पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवार बरसले
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी चोपडा -केंद्रातील सरकारने कायमच शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले असून या सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे अशी टीका केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथील आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उमेदवार श्रीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक प्रसेंजित पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार डॉ बी एस पाटील, विष्णू भंगाळे, माजी आमदार दिलीप सोनवणे, विनायक नाना पाटील, इंदिराताई पाटील, गोरख तात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, घनश्याम अण्णा पाटील, विजयाताई पाटील, नीलम पाटील, प्रतिभा शिंदे, भारती बोरसे, जगन पाटील, सुरेश बापू पाटील, जगन सोनवणे, चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, श्री सांगोरे, डी पी साळुंखे, चंद्रहास गुजराती उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,, अरुणभाई गुजराथी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार :श्रीराम पाटील
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आपण मेगा रिचार्जसह पाडळसरे प्रकल्पाला निधी आणून तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे अभिवचन दिले. संपूर्ण मतदारसंघात अधिकाधिक रोजगार निर्मिती प्रकल्प उभारून यावलच्या व्यास मंदिरासाठी पाल आणि परिसरातील पर्यटन स्थळांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. केळी पीक विम्याचे अजूनही हजारो शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित असून मतदारसंघात केळीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपल्याला संधी देण्याचे आवाहन श्रीराम पाटील यांनी केले.
श्री पवार पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मोदींनी यापैकी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. मात्र या काळात सत्तेचा दुरुपयोग करीत सत्ता जनतेच्या भल्यासाठी न वापरता ती स्वार्थासाठी वापरली असा घणाघात शरद पवार यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत