Header Ads

Header ADS

मालेगावाचे MIMचे महानगर प्रमुख ,माजी महापौर मालिकांवर अज्ञातांनी पिस्तुलाने केला गोळीबार

 

Malegaon-MIM's-metropolitan-head-former-mayor-owners-were-shot-by-unknown-persons-with-a-pistol.

मालेगावाचे MIMचे महानगर प्रमुख ,माजी महापौर मालिकांवर अज्ञातांनी पिस्तुलाने केला गोळीबार 

वृत्तसंस्था प्रतिनिधी -मालेगावएमआयएमचे मालेगाव महानगरप्रमुख व माजी महापौर अब्दुल मालिक युनूस इसा यांच्यावर दोन अज्ञातांनी पिस्तुलाने गोळीबार केला. अवघ्या पाच फुटांच्या अंतरावरून झाडलेल्या तिन्ही गोळ्या लागल्याने मालिक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याची थरारक घटना सोमवारी मध्यरात्री दीड वाजता जुना आग्रा रोडवर घडली.

    दरम्यान, जखमी मालिक यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला कुणी व का केला याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची शक्यता आहे. दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी घटनेच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे. अब्दुल मालिक हे रात्री एका जमीन व्यवहारासाठी आयशानगर भागात गेले होते. काम आटोपून दुचाकीने घरी जात असताना ते माजी नगरसेवक रहेमान शाह यांच्या जुना आग्रा रोडवरील बिल्डिंग मटेरियल दुकानाजवळ थांबले. खुच्र्यांवर बसून त्यांची चर्चा सुरू असताना दोन संशयित दुचाकीवरून आले. त्यांनी काही क्षणात मालिक यांच्याजवळ जाऊन अंदाधुंद गोळीबार केला. 

एक गोळी डाव्या हातात, दुसरी पायात घुसली. तिसरी गोळी पोटाला चाटून गेल्याने मालिक खाली कोसळले. हल्ला करून दोघे संशयित दुचाकीवरून फरार झाले. रहेमान शाह व सोबत असलेल्या अन्य व्यक्तींनी मालिक यांना तात्काळ रुग्णालयात दाखल . रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले.

    बोगस व्यक्तीवर कारवाई

पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, शहरात गुंडाराज सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा झोपली आहे का? मागील एका गोळीबाराच्या घटनेत मूळ आरोपींच्या जागी बोगस व्यक्तींवर कारवाई केली, असा गंभीर आरोप आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.