Header Ads

Header ADS

खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले जसखार येथील रत्नेश्वरी देवीचे दर्शन जसखार ग्रामस्थां तर्फे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे जल्लोषात स्वागत

MP-Srirang-Barne-taken-darshan-of-Ratneshwari-devi-at-Jaskhar-by-Jaskhar-villagers-by-Khasdar-Srirang-Appa-Barne-with-joyful-welcome


 खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले जसखार येथील रत्नेश्वरी देवीचे दर्शन 

जसखार ग्रामस्थां तर्फे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे जल्लोषात स्वागत


लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )जसखार गावाची ग्रामदेवता श्री रत्नेश्वरी देवीच्या यात्रा व पालखी उत्सवा निमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे आले असता ग्रामस्थांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर ढोल ताशावर मिरवणूक काढण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे उरण तालुका संपर्कप्रमुख श्री दीपक ठाकूर तसेच जसखार गावचे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश घरत व जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.प्रणाली किशोर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या सौ. दमयंती म्हात्रे, सौ.सीमा ठाकूर, सौ. धनश्री ठाकूर, सौ. हेमलता ठाकूर, सौ.वैजयंती ठाकूर यांचे समवेत युवा सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी उत्सवासाठी पाहुणे म्हणून श्री अतुल भाई भगत तसेच मेघाताई दबडे,माऊली घोगरे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

जसखार ग्रामस्थांकडू खासदार साहेबांचं विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बारणे यांचे रयत शिक्षण संस्थे चे कोकण विभागीय चेअरमन श्री पी. जे. पाटील यांच्या कुटुंबियांतर्फे श्री प्रशांत पाटील, तसेच भाजप पार्टी च्या महिला तालुका अध्यक्षा सौ. संगीता पाटील यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.त्यानंतर जेष्ठ नागरिक संस्थेकडून भास्कर मामा तांडेल त्याचबरोबर युवा सामाजिक संस्थेकडून हर्षल ठाकूर, नितीन पाटील, संदीप भोईर,मयूर तांडेल व निशांत ठाकूर तसेच शिवसेना शाखेकडून सुरेंद्र ठाकूर इतर शिवसैनिक महिला वर्ग व ग्रामस्थ यांच्याकडून खासदारांना शुभेच्छा ही देण्यात आल्या व त्यांचा जल्लोषात सन्मान केला

 युवा सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष हर्षल ठाकूर उपाध्यक्ष गर्दीश मात्रे सेक्रेटरी संदीप भोईर खजिनदार मयूर तांडेल माथाडी कामगार सेना उरण सचिव किशोर म्हात्रे सर्व युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.