आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये सुवर्ण कारागिरानेच केला सोन्याचा अपहार
आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये सुवर्ण कारागिरानेच केला सोन्याचा अपहार
लेवाजगत न्यूज जळगांव-दागिन्यांच्या डागडुजीसाठी दिलेले सोने हडप करून सुवर्ण कारागिरानेच १२ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये समोर आला आहे. या प्रकरणी बंगाली सोने कारागिर याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पेंद्र उर्फ सुदीप शेखर बेरा (वय-४४, रा. मालंचा बेंनियाजोला, खानाकूल-१, पश्चिम गोषपूर, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे बंगाली कारागिराचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील आर.सी. बाफना ज्वेलर्स दालनातील कारागिर पुष्पेंद्र बेरा याच्याकडे २८७.४३० ग्रॅम सोन्याचे मटेरिअल दिले होते. ४ मे रोजी स्टॉक तपासणी सुरू असताना पुष्पेंद्र याला दिलेल्या सोन्यापैकी केवळ ९२.३०० ग्रॅम एवढेच सोने आढळले. उर्वरित १९५.१३० ग्रॅम वजनाचे सोने कमी असल्याने पुष्पेंद्र याने १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोने गायब केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शोरुमचे फ्लोअर मॅनेजर गणेश काळे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पुष्पेंद्र बेरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रवींद्र बोदवडे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत