Header Ads

Header ADS

घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंगचे तुकडे करायला सुरुवात, 40 तास उलटूनही शोधकार्य जारी, ढिगाऱ्याखाली आणखी किती जण?


 घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंगचे तुकडे करायला सुरुवात, 40 तास उलटूनही शोधकार्य जारी, ढिगाऱ्याखाली आणखी किती जण?


लेवाजगत न्युज मुंबई : घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर (Ghatkopar Petrol Pump Hording) कोसळलेल्या महाकाय होर्डिंगचा सांगाडा हटवण्याचं काम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सांगाड्याखाली अजूनही  30 ते 40 जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफसह विविध यंत्रणा बचावकार्य करत आहेत. होर्डिंगचा सांगाडा पूर्णपणे हटवण्यास आणखी 24 तासांचा वेळ लागेल अशी शक्यता आहे. पेट्रोल पंपावरील पेट्रोल, डिझेलचे साठे, तसंच सीएनजीचा बाटला यामुळे सांगडा कापण्याचं काम कूर्मगतीने सुरू आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झालेत तर 88 जण जखमी झालेत. यातील  44 जण उपचाराधीन असल्याचं समजतंय. त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. या पेट्रोल पंपावर पडलेला सांगाडा उचलण्यासाठी भल्या मोठ्या क्रेनची मदत घेतली जातेय. आत्तापर्यंत 50 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झालंय.  

 पंपावरच सारं इंधन आणि सीएनजी रिकामं केलं

घाटकोपर दुर्घटनेला 40 तास उलटले तरीही बचावकार्य सुरूच आहे. पेट्रोल पंप, सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता. मात्र आता  पंपावरच सारं इंधन आणि सीएनजी रिकामं करण्यात आलंय.  ढिगा-यातून काढलेलं भंगार गॅस कटरनं कापून वेगळं केलं जातंय. अजुनही लोखंडी ढिगा-यात काहीजण अडकल्यानं शोधकार्य सुरूच आहे.  

काही जण अडकल्याची शक्यता 

एनडीआरएफ असिंस्टंट कमांडर निखील मुधोळकर म्हणाले,  एक एक गर्डर आम्ही वेगळे करतोय. गॅस कटरच्या सहाय्यानं लोखंडी भाग कापून वेगळे केले जात आहेत. कुठेही आग लागलेली नाही, छोटासा स्पार्क होता. दोन मिनिटांत तो विझवला.  एका गर्डरखाली एक गाडी दबलेली आहे. त्यात काहीजण असल्याची शक्यता आहे

40 तासांत 88 जणांना केले रेस्क्यू 

 घाटकोपरमध्ये  40 तासांमध्ये आतापर्यंत एकूण 88 लोकांना रेस्क्यू करण्यात आला आहे. त्यातून 14 लोकांचा मृत्यू झाली आहे.  अग्निशामन दलाचे जवान सोबत मुंबई महानगरपालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंटचे टीम अजूनही रेस्क्यू ऑपरेशन करत आहे.जवळपास 30 ते 40 लोकं अजून आत मध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याची शक्यता आहे, अशी महिती स्थानिकांनी दिली आहे.  30 ते 40% पेट्रोल पंप वरच्या ढिगारा काढण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर 60 ते 70 टक्के अजूनही होर्डिंग बोर्डाचा ढिगारा आहे. संपूर्ण ढिगारा काढून त्याच्याखालून रेस्क्यू करण्यामध्ये अजूनही 24 तास लागण्याची शक्यता आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.