Header Ads

Header ADS

गॅस्ट्रो सदृश्य आजाराची मोठा वाघोदा येथे लागण; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मात्र इंकार

Gastro-similar-disease-complaint-infectious-taluka-medical-officials-but-denial


 गॅस्ट्रो सदृश्य आजाराची मोठा वाघोदा येथे लागण; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मात्र इंकार -एका महिलेचा मृत्यू ?

लेवाजगत न्यूज सावदा -येथून जवळच असलेल्या वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथे गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण झाली असून वघोदा बु येथील  वीस रुग्णांवर सावदा येथील वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. या घटनेने तालुका वैद्यकीय अधिकारी खडबडून जागे झाले असले तरी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मात्र असला कुठलाही प्रकार वाघोदा गावात नसल्याचे स्पष्ट इन्कार केला आहे. वाघोदा गावातील गणेश नगर, आंबेडकर नगर ,मोठा वाडा ,बेघर वस्ती या भागातील रुग्णांवर सावदा येथील खाजगी दवाखान्यात वीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत या रुग्णांना उलट्या मळमळ व अतिसाराची लक्षणे आहेत.  दूषित पाण्यामुळे किंवा ऊन लागल्यामुळे रुग्णांना ही लक्षणे जाणवत असल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज  खाजगी डॉक्टरांकडून वर्तवला जात आहे.

गॅस्ट्रो सदृश्य आजारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा  गावातील नागरिकांनी केला आरोप

तर गावातील गॅस्ट्रोस्रदृश्य आजाराच्या रुग्णांची माहिती गोळा करणे चालू असून पाण्याची ओटीए तपासणी देखील चालू करण्यात आली आहे कुणालाही गॅस्ट्रो सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित वाघोदा येथील उप आरोग्य केंद्रामध्ये आयव्हीं व औषधोपचार उपलब्ध असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.