चार महिन्याचा तान्हुला हा आठ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या आईच्या दुधासाठी व्याकूळ
चार महिन्याचा तान्हुला हा आठ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या आईच्या दुधासाठी व्याकूळ
लेवाजगत न्यूज जळगाव-बँकेत केवायसी अपडेट करून येते सांगून आठ दिवसांपासून चार महिन्याच्या बाळाची आई बेपत्ता झाली आहे. सासूजवळ सोपवून गेलेले बाळ आईच्या दुधाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वत्र शोधूनही पत्नी सापडत नसल्याने पतीने समाज माध्यमावर माहिती सांगणाऱ्यांना रोख रकमेचे बक्षीसही जाहीर केले आहे.
जुना खेडी रोड परिसरातील तळेले कॉलनीतील रहिवासी दिनेश भागवत भोळे यांचे भुसावळ येथील आरती पाटील हिच्यासोबत २५ एप्रिल २०२२ रोजी विवाह झाला आहे. ते दोघे पुणे येथे नोकरीला आहेत. ऑक्टोबर महिन्यात डोहाळ जेवणानंतर आरती बाळंतपणासाठी भुसावळ येथे माहेरी गेली होती. भोळे दाम्पत्याला मुलगा झाल्यानंतर २१ एप्रिल रोजी आरती जळगाव सासरी आली. दुसऱ्याच दिवशी तिला महापालिकेच्या दवाखान्यात बाळाला लस टोचण्यासाठी फोन आला. त्यामुळे २२ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आरती सासूला सोबत घेऊन दवाखान्यात जाण्यास निघाली. महमार्गावर पोहचल्यावर लस आज मिळणार नसल्याचे कळल्याने आरतीने शिव कॉलनीतील स्टेट बँकेत जावून केवायसीचे काम करून येते असे सांगून बाळाला सासूकडे सोपवून ती एकटीच निघाली. या वेळी सासू,सासरे व दीर यांनी तिला नंतर जा असे सांगून देखील ती बँकेत एकटीच गेली. बराच वेळ झाला पण ती घरी परत न आल्याने पुण्यात राहणाऱ्या तिच्या पतीने मोबाइलवर संपर्क केला. तेव्हा ती भुसावळ व सावदा परिसरात असल्याचे लोकेशन मिळाले. त्यानंतर तिचा फोन बंद येत आहे. तर दुसरीकडे तिचा चार महिन्याचा तान्हुला हा आईच्या दुधासाठी व्याकूळ झाला आहे. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन देखील ती सापडत नसल्याने तिचा ठाव ठिकाणा सागणाऱ्यास दिनेश भोळे यांनी रोख रक्कमेचे बक्षिस जाहीर केले आहे. दरम्यान, या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिनेश भोळे यांच्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत