Header Ads

Header ADS

महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून नेत ठिकठिकाणी अत्याचार

Forced-carrying-the-woman-on-a-two-wheeler-to-place-torture


महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून नेत ठिकठिकाणी अत्याचार

 लेवाजगत न्यूज धरणगाव – तालुक्यातील पाळधी गावातील २८ वर्षीय महिलेला जबरदस्ती शिरपूर येथे पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात मंगळवारी २८ मे रोजी रात्री १ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात २८ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच गावात राहणारा संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन याने २६ जानेवारी ते २६ मे दरम्यान महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून शिरपूरसह इतर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान पीडित महिलेने  धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन मंगळवारी २८ मे रोजी मध्यरात्री एक वाजता संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.