रेल्वे रुळावर तरुणीचा मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
रेल्वे रुळावर तरुणीचा मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
लेवाजगत न्यूज जळगाव- काही वेळापूर्वी घरातून गेलेल्या कोमल संजय निंबाळकर (वय- १७, रा. हरिओम नगर जळगाव ) हिचा शोध घेत असताना आईला तिचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला. ही धक्कादायक घटना सोमवार दिनांक ६ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातील हरिओम नगरमधील रहिवासी असलेली कोमल निंबाळकर हिने इयत्ता अकरावीची परीक्षा दिली होती. ती आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होती. तिचे वडील मोलमजुरी करतात. सोमवार, ६ मे रोजी कोमल ही घरातून बाहेर गेली होती. त्या वेळी तिची आई व भाऊ तिचा शोध घेत होते. त्या वेळी एका महिलेने सांगितले की, ती आसोदा गेटकडे जाताना दिसली. त्या वेळी दोघेजण तिकडे गेले असता तेथे डाऊन लाईनवर खांबा क्रमांक ४२१ जवळ मृतावस्थेत आढळून आली.
रेल्वेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या विषयी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी पोलिस तेथे पोहचले व त्यांनी कोमलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत