श्रीराम पाटील यांना निवडून द्या, मलकापूर-नांदुरा भागात उद्योगांना चालना मिळेल-आमदार राजेश एकडे
श्रीराम पाटील यांना निवडून द्या, मलकापूर-नांदुरा भागात उद्योगांना चालना मिळेल-आमदार राजेश एकडे
लेवाजगत न्यूज नांदुरा-महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी शून्यातून विश्व निर्माण करत हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या भागाचे ते खासदार झाल्यास उद्योगांना चालना मिळून बेरोजगारीचा प्रश्न सुटेल असा आशावाद मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केला.
निमगाव ता. नांदुरा येथे महाविकास आघाडीच्या आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते
ते पुढे म्हणाले की, देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. देशभरात मोदी विरुद्ध लाट निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात जनतेला भूलथापेशिवाय दुसरे काही मिळाले नाही. श्रीराम पाटील भाग्यवान आहेत की, त्यांनी या वेळेला उमेदवारी घेतली आहे. त्यांचा विजय हा नक्की आहे. निमगाव परिसर नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, आता श्रीराम दादा पाटील यांच्याही पाठीशी मी उभा राहील यात शंका नाही. यावेळी प्रसन्नजीत पाटील, अरविंद कोलते, संतोष रायपुरे, वनिता गायकवाड यांचीही भाषणे झाली. या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मत देऊन श्रीराम पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
विकास कामाचा अनुशेष भरून काढू : श्रीराम पाटील
जनतेचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी, मी सदैव जनतेच्या सेवेत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीन.गेल्या दहा वर्षाचा विकास कामाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा आहे. नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटचा प्रश्न आमदार राजेश एकडे यांच्या सहकार्याने सोडवला जाईल असे आश्वासन उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत