Header Ads

Header ADS

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये सुनेच्या जबाबदारीपोटी जाण्याचा निर्णय घेतला–रोहिणी खडसे

Eknath-Khadse-decided-to-go-to-BJP-due-to-the-responsibility-of-daughter-in-law-Rohini-Khadse


एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये सुनेच्या जबाबदारीपोटी जाण्याचा निर्णय घेतला–रोहिणी खडसे

लेवाजगत न्यूज जळगाव- जिल्हयाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ खडसे खूप भावनिक आहेत. ते स्वार्थ पाहत नाही. रक्षा खडसे एकट्या आहेत. कदाचित एकनाथ खडसे यांनी सासरे म्हणून सून रक्षा खडसे यांच्या बद्दलच्या जबाबदारीपोटी वेगळा निर्णय घेतला असावा. जर निखिल खडसे आज हयात असते तर कदाचित एकनाथ खडसे यांना असा निर्णय घेण्याची गरज वाटली नसती. कदाचित आज त्यांना सुनेला एकटे सोडून देणे योग्य वाटत नसेल असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

   पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे यांनी जेवढे राजकीय काम केले आहे, त्यामुळे त्यांना राजकीय निर्णयासाठी माझ्या सल्ल्याची गरज नाही. ते त्यांचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणे पसंत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडताना एकनाथ खडसे यांनी मला मुलगी म्हणून सोबत येण्याबद्दल विचारणा केली होती, मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिला. आज माझी ओळख शरद पवार यांच्यामुळे आहे. मी शरद पवारांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास व्यक्त करत असे सांगितले आणि त्यानंतर आम्ही दोघांमध्ये चर्चा झाली नाही. त्यांनी मला राजकीय निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.