Header Ads

Header ADS

दुभत्या म्हसीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने तीचा मृत्यू

Dubhatyā-mhaisīchyā-aṅgāvara- vidyuta-vāhaka-tāra -paḍalyānē-tīchā-mr̥tyū


दुभत्या म्हसीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने तीचा मृत्यू

उरण (सुनिल ठाकूर ) उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील हि घटना आहे. महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका  त्यामुळे एका मुक्या प्राण्याचा जीव गेला आहे. विंधणे ग्रामपंचायत हद्दीत गुरूवार दि२३ मे रोजी सकाळी ठिक ५-३०च्या सुमारास शाँक लागून म्हैसीचा तडफडून मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचे पंचनामे केले आहेत.

      हाती आलेल्या माहितीनुसार विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी लहू भिवा भोईर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुधाचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या गोठ्याजवळून महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारा जात आहेत. आणि याचा फटका कधीही बसू शकतो, या अनुषंगाने सदर धोकादायक विद्युत वाहक तारा हटविण्यासाठी लहू भोईर यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मागणी केली होती. परंतु मागणीची दखल संबंधित कर्मचाऱ्यांनी,उप अभियंत्यांनी घेतली नाही.  आणि गुरूवार दिनांक २३ मे रोजी सकाळी ठिक ५-३० च्या सुमारास लहू भोईर यांच्या गोठ्या जवळील एका म्हैसीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याची दुदैवी घटना घडलीच.यावेळी म्हैस तडफडून हंबरडा फोडू लागल्याने लहू भोईर यांचे कुटुंब झोपेतून जागे झाले.त्यांनी झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून उर्वरित म्हैसींच्या गळ्यातील दोर कापले त्यामुळे इतर म्हैसी बचावल्या आहेत,तसेच झालेल्या शाँट सर्किटमुळे लहू भोईर यांची सून,मूलगा  थोडक्यात म्हैसींचा बचाव करताना ते बचावले असले तरी अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने एका दुभत्या म्हैसीचा तडफडून मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन भोईर कुटुंबियांना सहकार्य केले आहे. तसेच पशुसंवर्धन अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचे पंचनामे सुरू केले आहे.झालेल्या घटनेसंदर्भात महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

"महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सदरची दुदैवी घटना घडली आहे.तरी लहू भोईर यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचारी, अभियंत्यांवर  कारवाई करावी तसेच भोईर कुटुंबियांना नुकसान भरपाई तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी " 

     सुनिल जोशी -सामाजिक कार्यकर्ते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.