Header Ads

Header ADS

धुळ्यात वंचित बहुजन आघाडीला फटका उमेदवार अब्दुल रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद

 

धुळ्यात वंचित बहुजन आघाडीला फटका उमेदवार अब्दुल रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद

लेवाजगत न्युज धुळे : धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळ्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रेहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील या आघाडीचे धुळे लोकसभा लढवण्याचे स्वप्न भंगले आहे.

छाननीत अर्ज ठरला बाद


वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून प्रचारही सुरू केला होता. पण शनिवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत अब्दुल रेहमान यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. यासाठी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा त्यांचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याचा दाखला देण्यात आला.

हायकोर्टात दाद मागणार


दुसरीकडे, अब्दुल रेहमान यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच या प्रकरणी आपली याचिका दाखल करणार आहेत. धुळे लोकसभा मतदार संघात मुस्लिमांची जवळपास अडीच लाख मते असून वंचितच्या आगामी रणनितीला अर्ज बाद झाल्यानंतर ब्रेक लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.