Header Ads

Header ADS

धनाजी नाना चौधरी यांची 133 वी जयंती साजरी

 

Dhanaji-Nana-Chaudhary's-133rd-birthday-celebration

धनाजी नाना चौधरी यांची 133 वी जयंती साजरी

लेवाजगत न्यूज फैजपूर-आज दि. 14 मे 2024 रोजी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी कर्मवीर धनाजी नाना चौधरी यांचे 133 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, चेअरमन लीलाधरशेठ चौधरी, सचिव एम. टी. फिरके, सहसचिव एन. ए. भंगाळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. जगदीश पाटील, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. पी. डी. पाटील, उप प्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव आणि महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सण- उत्सव समितीचे चेअरमन  डॉ.मारोती जाधव यांनी केले. प्रास्ताविकामध्ये जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून जीवनभर अविरत कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे कर्मयोगी धनाजी नाना चौधरी हे होत. त्यांच्या कार्यामुळे खानदेशाचे नाव फैजपूरच्या माध्यमातून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. असे मत मांडले.  कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करण्यासाठी धनाजी नाना महाविद्यालयाचे ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी धनाजी नाना चौधरी हे स्वातत्र्यपूर्व काळातील भारताला स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करत होते. त्यांचा जन्म 14 मे 1891 रोजी खिरोदा ता. रावेर जि. जळगाव येथे शेतकरी कुंटुंबात झाला. उच्चशिक्षण घेतल्यानंतर ब्रिटीश सरकारच्या पोलिस दलात नाशिक येथे फौजदार पदावर कार्यरत होते. परंतू नंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी फौजदाराची नोकरी सोडून खेड्यांमध्ये कॉग्रेसचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी 1934 मध्ये खिरोदा येथे स्वराज्य आश्रमाची स्थापना केली. यातून भारतीय स्वातंत्र्यलढयाचे कार्य चालू ठेवले. याच कार्याची दखल घेउन त्यावेळीं अनेक प्रांतामध्ये कॉग्रेसचे अधिवेशन घेण्याच्या स्पर्धा होती असे 

असतानाही त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 ला फैजपूर येथे आयोजित केले आणि ते यशस्वीरीत्या पार पाडले. जीवनभर त्यांनी सातपुड्यातील आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य केले. अशा विविध कार्यावर प्रा. गायकवाड यांनी प्रकाश टाकला. आभार प्रा. एस.के. पाडवी यांनी मानले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.  शेखर महाजन आणि सिद्धार्थ तायडे यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.