मंगळवार रोजी सावदा व फैजपूर येथे स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे
मंगळवार रोजी सावदा व फैजपूर येथे स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे
लेवा जगत न्यूज सावदा- दिनांक ७ मे रोज मंगळवारी अक्कलकोट येथून पालखी परिक्रमांच्या माध्यमातून येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन भाविकांना होणार आहे तरी सर्व भक्त भाविकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे.
कार्यक्रमाचे नियोजन अशा प्रकारे असून फैजपूर सकाळी ८ ते११ वाजता श्री दत्त मंदिर गावात श्री जितेंद्र वर्माजी यांच्या घरी सावदा केंद्र रावसाहेब प्रेमचंद नगर डॉ सुनिल चौधरी दवाखाना जवळ दुपारी १२ ते ४ अक्कलकोट ची स्वामींची पालखी पादूका दर्शन साठी येणार आहे. सर्व जण भाग्यवंत आहोत की प्रत्यक्ष स्वामीं महाराज आपल्याला दर्शन देण्यासाठी त्यांच्या समाधी मठातील पादूका सह येत आहे आपल्याला अक्कलकोट ला गेल्यावर सुद्धा श्री स्वामींच्या पादूकाचे दर्शन दूरून घ्यावे लागते परंतु पालखी मध्ये स्वामींच्या पादुकावर प्रत्यक्ष माथा ठेवता येणार आहे व स्वामींना आपल्या अडचणी दुःख सांगता येणार आहे ह्या पालखीचा दरवर्षी प्रमाणे खुप अनुभव आलेले आहेत.जो कोणी भाविक पालखी सोहळात सहभागी होतो त्याचे सर्व दुःख कष्ट स्वामीं महाराज क्षणात मिटवतात असे अनेकांना अनुभव आलेले आहेत.
तरी सावदा व फैजपूर येथे होणाऱ्या कलकोट अन्नपुर छत्राच्या मार्फत येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका चा दर्शनाचा सर्व फक्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दुसरे स्वामी समर्थ केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत