Header Ads

Header ADS

उन्हाचा त्रास झाल्याने रायगड जिल्ह्यात मतदाराचा मृत्यू

Death of a voter in Raigad district due to heat stress


उन्हाचा त्रास झाल्याने रायगड जिल्ह्यात मतदाराचा मृत्यू

रायगड: जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४१ डिग्रीच्या पुढे गेला असून सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. महाड तालुक्यातही उष्म्याचा पारा आज (७ मे) सकाळपासून ३९ डिग्रीच्या पुढे आहे.

   किंजळोली बु. दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकाटे हे सकाळी ९ वाजता दाभेकर कोंड येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. मात्र मतदान केंद्राबाहेरच १०० मीटर अंतरावर उन्हाच्या त्रासाने ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.