Header Ads

Header ADS

चिनावल तिसऱ्या दिवशी रात्री बारानंतर संचारबंदी शिथिल ,उद्याचा बाजार बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय गावात शांतता राखण्यासाठी सर्व स्तरीय समिती नेमून जबाबदारी घ्या-अशोक नखाते

 

Chinawal-third-day-of-communication-ban-after-12-night-communication-ban-relaxed-tomorrow-market-closed-by-villagers-decision-to-appoint-all-level-committee-to-take-responsibility-to-maintain-peace-in-the-village

चिनावल तिसऱ्या दिवशी रात्री बारानंतर संचारबंदी शिथिल ,उद्याचा बाजार बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

   गावात शांतता राखण्यासाठी सर्व स्तरीय समिती नेमून जबाबदारी घ्या-अशोक नखाते

लेवाजगत न्यूज चिनावल -चिनावल गावात कायम स्वरुपी शांतता राखण्यासाठी आपण सर्व स्तरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एक समिती बनवून गावातील वाद गावात च मिटल्या पाहीजे ‌.या पुढे जर गावात असे प्रकार वारंवार घडल्यास या वेळी लागलेल्या संचारबंदी बंदी पेक्षा ही कठोर कारवाई करण्याचा इशारा आज दिनांक २० रोजी चिनावल येथे झालेल्या सर्व स्तरीय बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक  अशोक नखाते यांनी आज दिला.

     येथील नूतन विद्यालयात सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजता बैठक झाली या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,रावेर तहसीलदार बंडू कापसे , मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे सावदा पोलीस ठाण्याचे सपोनी जालिंदर पळे यांचे सह गावातील प्रमुख पदाधिकारी जबाबदार नागरिक उपस्थित होते. सदर वेळी गावात शांतता राखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयी चर्चा झाली गावकरी यांनी आपल्या भावना मांडल्या सदर वेळी नखाते यांनी सदर घटनेतील आरोपी शोधून कायदेशीर कारवाई तर करणारच आहे मात्र या पुढे असे घडता कामा नये कोणी जर आपल्याला भडकवत असेल तर अशा लोकांवर विश्वास ठेवू नका अंशी तंबी दिली.             दरम्यान सदर घटना दिनांक १७ च्या रात्री चिनावल येथे झालेल्या दगडफेक नतंर येथे सुरू असलेल्या ३ दिवसांच्या संचारबंदी च्या  आजच्या तिसऱ्या  दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही  मात्र शेतकरी शेतमजूर यांना शेतातील कामे करता यावी यासाठी सकाळी ७ ते ८ व दुपारी परत येण्यासाठी १२ ते १ अशा दोन तासाची प्रशासनाने शिथीलता दिल्याने आज  ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला उर्वरित वेळेत आज दि २० रोजी तिसऱ्या दिवशीही सर्वत्र शुकशुकाट व शांतता होती.

      गावात जिल्हा पोलिस अधीक्षक  महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पो स्टेशन चे सपोनी जालिंदर पळे,पो उप निरीक्षक विनोद खांडबहाले,अमोल गर्जे हे  आजही तळ ठोकून आहेत तर पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याने संपूर्ण चिनावल गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आले तर महसूल विभागिचे  तहसीलदार बंडू कापसे,अप्पर तहसीलदार मयूर कळसे,नायब तहसीलदार संजय तायडे मडळाधिकारी अनंत खवले, तलाठी लिना राणे हे सुद्धा संचारबंदीत लक्ष ठेवून आहे तर आज दि २० रोजी संचारबंदी मध्यरात्री संपणार आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.