Header Ads

Header ADS

चिनावल येथे दोन गटात वाद, प्रचंड दगडफेक सोमवर रात्री पर्यंत संचारबंदी महिलेचा विनयभंग मंगळसूत्र गहाळ

 

Chinaval-two-group-argument- heavy-stone-pelting-on-Monday-night-till- curfew- woman- molestation-mangalsutra-missing

किरकोळ कारणावरुन चिनावल येथे दगडफेक:सावदा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

लेवाजगत न्यूज चिनावल - "सदर दगडफेकीत रात्रीच्या वेळी कर्तव्यवर असलेल्या पो.नाईक.मझर खान पठाण यांच्या पोटावर एक विट  लागल्याने तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून  शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला.अशी फिर्यादवरुन शेख इरफान शेख कुतुबुद्दीन,फैजान इरफान शेख,मोहीत विलास महाजन,निसार डॉक्टर(पुर्ण नाव माहीत नाही) व इतर १० ते १५ सर्व रा.चिनावल यांचे विरुद्ध  सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

------------------------------------------------------

"तसेच चिनावल गावातील महादेव वाडा ते मेस्को वाडा यास जोड रस्त्याच्या बोळीतून शेख इरफान शेख कुतुबुद्दीन,हयात खान वाहेद खान,शेख नजीर शेख बशीर,निसार(डॉक्टर पुर्ण नाव माहीत नाही)हे पळत आले.त्यांचे मागे बरेच लोक होते.यांनी रस्त्यावरील दुचाकींचे नुकसान करित होते.तरी या रस्त्यावर वाकींग करित असलेल्या दोन्ही महिला रस्त्याचे बाजू झाले असता सदरील १ ते ४ यांनी फिर्यादी महिला माधुरी युवराज महाजन गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडून घेतली.यावेळी प्रतिकार करणारी महिला वर्षा महाजन यांचा विनयभंग केला.या प्रकरणी वरील आरोपींसह १५० ते २०० यांचे विरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

--------------------------------------------------------

 "या घटनेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,  अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव,अन्नपूर्णा सिंह सहा. पोलीस अधीक्षक फैजपूर, राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर,कृष्णकांत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ,यांनी रात्रीच भेट दिली.तरी सध्या चिनावल गावात दि.१८ मे रोचीचे १ वाजेपासून ते दि.२० मे २०२४ चे १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

--------------------------------------------------------

लेवाजगत न्यूज शाम पाटील सावदा :- चिनावल गावात एका ट्रॅक्टर व दुचाकी चालकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू असताना यादरम्यान काहीजणांनी चिनावल येथे महादेव वाडा,महाजन वाडा व वाणगल्ली भागात दगडफेक केली.यात दुचाकी व चारचाकी वाहनाचे नुकसान झाले.एका महिलेचे मंगळसूत्रही लांबविण्यात आले.ही घटना दि.१७ मे रोजी शुक्रवारी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास घडली.


दगडफेकीची घटना घडताच नागरिक संतप्त झाले.त्यांनी चिनावल पोलिस चौकीसमोर जमत तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले आणि आरोपींना अटकेची मागणी केली.यानंतर काही वेळातच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी पोहोचले.त्यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या.तसेच ठिय्या आंदोलन करणाऱ्या नागरिक व महिलांची भेट घेऊन २४ तासांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.त्यानंतर जमाव शांत झाला.या घटनेनंतर चिनावल गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.परिणामी गावात तणावपूर्ण शांतता आहे.

तसेच ट्रॅक्टर व दुचाकी स्वरांमध्ये झालेल्या वादामुळे चिनावल येथे दोन समाजाचे लोकांकडून दगडफेक झाल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावरून सांगितले असून,दोषींवर कारवाई होणार आहे.लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी,असे आव्हान देखील नखाते साहेब यांनी याप्रसंगी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.