Header Ads

Header ADS

चिनावल येथे आज शेतकरी शेतमजुरांसाठी शेतात जाण्यासाठी सकाळी ८पर्यंत व येण्यासाठी दुपारी १२ ते एक पर्यंत संचार बंदी शिथिल,आस्थापने दुकाने बंद राहतील

 

Chinaval-here-today-farmers-for-farm-labourers-to-go-to-the-field-till-8-am-and-to-arrive-in-the-afternoon-12-to-one-communication-ban-relaxed-establishments-shops-will-remain-closed

चिनावल येथे शुकशुकाट, आज शेतकरी शेतमजुरांसाठी शेतात जाण्यासाठी सकाळी ८पर्यंत व येण्यासाठी दुपारी १२ ते एक पर्यंत संचार बंदी शिथिल,आस्थापने दुकाने बंद राहतील

लेवाजगत न्यूज  चिनावल-गेल्या १७ मे रोजी दंगल उसळलेल्या चिनावल गावात संचारबंदी लावली आहे. या संचार बंदीच्या दुसऱ्या दिवशी गावात शुकशुकाट होता. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळ तासभर संचारबंदीत शिथिलता दिली होती. दरम्यान, दंगलीत दगडफेक होऊन वाहनांचे नुकसान, विनयभंगाचे प्रकार झाले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. आज दिनांक २० ,सोमवार रोजी शेतकरी व शेतमजूर यांना शेती काम करण्या साठी सकाळी एक तास तर दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत एक तास शेतातून घरी परत येण्यासाठी संचार बंदी शिथिल करण्यात आली आहे. तसेच सोमवारी संचारबंदीची मुदत रात्री १२ वाजता संपत आहे.त्यानंतर पुढील निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.

    पोलिस अधिकारी गावात तळ ठोकून

गावात कोणतीही दुकाने व आस्थापने सुरू नसल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. पोलिस संशयितांच्या मागावर असून सर्व बाजूने चौकशी सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगरचे डीवायएसपी राजकुमार शिंदे, सावद्याचे एपीआय जालिंदर पळे गावात तळ ठोकून आहेत. महसूलचे अधिकारी सुद्धा स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

 पहिली फिर्याद माधुरी महाजन व वर्षा महाजन यांनी दिली. त्यात शे. इरफान कुतुबुद्दीन, हयात खान   वायदखान, निसार डॉक्टर व शे. नजीर शे. बशीर व त्यांच्या मागे पळत येणाऱ्या जमावाने दगडफेक केली. गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र तोडले. छेडखानी केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तर दुसऱ्या फिर्यादीमध्ये याच दगडफेकीदरम्यान पोलिस नाईक मझहरखान पठाण यांच्या पोटावर वीट लागली. एका पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. यावरून शे. इरफान शे. कुतुबुद्दीन, शे. फैजान इरफान, मोहित महाजन व निसार डॉक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी संचारबंदी लागू केल्यामुळे गावात शुकशुकाट तर दिसून आलेच परंतु यापुढेही कारवाई सुरु राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.