लाच घेतल्याच्या आरोपाखाली सहाय्यक संचलाकासह चौघांना अटक, सीबीआयची कारवाई
लाच घेतल्याच्या आरोपाखाली सहाय्यक संचलाकासह चौघांना अटक, सीबीआयची कारवाई
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या कारवाईत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) सहाय्यक संचालकासह चौघांना अटक केली. त्यांच्यावर कंपनीच्या प्रलंबित बिलांना मंजुरी देण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने शोधमोहीमही राबवली असून त्यात ३७ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
सहाय्यक संचालक (तांत्रिक) अमोल जगताप, खासगी कंपनीचे संचालक विकास भारद्वाज, वरिष्ठ व्यवस्थापक हर्षल चौगुले व कंपनीचा प्रतिनिधी गुरूनाथ दुबूले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रलंबित बिले मंजूर करण्याच्या बदल्यात लाच घेत असल्याचा आरोप आहे. सीबीआयने सापळा रचून खासगी कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत एक लाख २० हजाराची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली चौघांना अटक केली. आरोपींच्या कार्यालयात व निवासी परिसरात झडती घेण्यात आली असून त्यात ३७ लाख ३० हजार रुपयांची रोख, ४५ ग्रॅम सोने व विविध स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत