आमोदा येथे श्रीराम मंदिरात भीषण आग, येथील जिल्हा बँकेची शेजारी असलेली शाखा जळून खाक
आमोदा येथे मंदिरात भीषण आग, येथील जिल्हा बँकेची शेजारी असलेली शाखा जळून खाक
लेवाजगत न्यूज आमोदा -आमोदा तालुका यावल येथील श्रीराम मंदिरात भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज यावेळी नागरिकांनी व्यक्त केला . श्रीराम मंदिरा शेजारीच असलेल्या असलेल्या जिल्हा बँक शाखेलाही आग लागली. आज विजवण्यासाठी सावदा, फैजपूर, यावल, भुसावळ नगरपालिकेचे अग्नीबंब मागवण्यात आले होते. आग रात्री उशिरापर्यंत आटेक्यात आली नाही.
फैजपूरपासून ५ किलोमीटर लांब असलेल्या आमोदा या गावामध्ये प्रभू श्रीराम यांचे अनेक वर्षांपासूनचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये दररोज पूजा अर्चा होत असते. गुरुवारी दि. २ मे रोजी रात्री दहा वाजेनंतर मंदिरात कुणी नव्हते. तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानंतर या ठिकाणी मोठी आग लागली आग लागली. आग इतकी पसरली की मंदिराच्या वर असणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा देखील पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नागरिकांसह अग्निशामक दलाचे बंबांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. जळगाव पासून अग्निशामक बॉम्ब बोलवण्यात आले. जळगाव फैजपूर, सावदा, रावेर, यावल, भुसावळ या ठिकाणच्या सुमारे बारा बंबांनी पहाटे अडीच वाजेपर्यंत पूर्ण आग आटोक्यात आणून विझवली. या वेली मोठ्य संख्येने गाव व परिसरातील नागरिक आग विजवण्यासमदत करीत होते. या सर्व आगीमध्ये मंदिराचा काही भाग वगळता जिल्हा बँकेची संपूर्ण शाखा जाळून खाक झाली. यात मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
जिल्हा बँकेचे चेअरमन रात्री घटनास्थळी अडीच वाजे पर्यंत जातीने हजर
विशेष म्हणजे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार याना घटनेची माहिती मिळताच ते रात्रीच घटना स्थळी हजर होऊन रात्री आग विझे पर्यंत सुमारे अडीच वाजे पर्यंत घटनास्थळी आमोदा येथे हजर राहून आग विझविण्यासाठी प्रयत्न करून मार्गदर्शन करीत होते. त्यांचे सोबत सुनील युनियन अध्यक्ष व अधिकारी रात्री जातीने घटनास्थळी हजर होते.
तसेच सकाळी आठ वाजता बँकेचे एम डी जितेंद्र देशमुख, शेती कर्ज मॅनेजर मंगल दादा सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. मार्गदर्शक सूचना दिल्या. पुन्हा आज ११ वाजेपासून दुसऱ्या ठिकाणी दूध डेअरी च्या जागेवर आजच बँकेचे व्यवहार सुरू करीतअसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
फैजपूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत