Header Ads

Header ADS

अक्षयतृतीयाच्या शुभ पर्वावर सामूहिक घागर भरणीकार्यक्रमाचे सावदा श्रीस्वामीनारायण मंदिरात आयोजन

Akṣayatr̥tīyācyā-śubha-parvāvara- sāmūhika-ghāgara-bharaṇīkāryakramācē-sāvadā-śrī-svāmīnārāyaṇa- mandirāta-āyōjana
         (हे चित्र मागील वर्षीच्या घाघरभरणी कार्यक्रमाचे आहे)

अक्षयतृतीयाच्या शुभ पर्वावर सामूहिक घागर भरणीकार्यक्रमाचे सावदा श्री स्वामीनारायण मंदिरात आयोजन

लेवाजगत न्यूज सावदा- सावदा येथेल श्री स्वामिनारायण मंदिरद्वारा आयोजित अक्षय तृतीया या शुभ-पर्वावरसामूहिक घागर भरणीचा कार्यक्रम मागीलवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी पूर्वजांची घागर भरली करायची असल्यास परिसासह हरिभक्त त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा सहभाग नोंदवण्यासाठी श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे संपर्क साधावा.

     अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे…….! या दिवशी केलेले कार्य कधिही क्षय होत नाही. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते व त्यांच्या नावाने नैवेद्य दाखवला जातो. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला अक्षय मिळत राहो त्याचा कधीही क्षय होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणून आपल्या घरातील दिवंगत झालेले आपले पूर्वज त्यांच्या मोक्षार्थ आपण त्यांच्या नावाची घागर भरत असतो. ही आपली प्राचीन परंपरा आहे.

या अक्षय तृतीयेच्या पवित्र परवावर घागर भरत असताना जर आपणास एखादी अडचण आली किंवा काही कारणास्तव आपल्या पूर्वजांच्या नावानी घागर भरायची राहून गेली तर मनामध्ये सतत काहीतरी राहून गेल्याची जाणीव सतत आपल्याला बेचैन करत असते. हया आपल्या विविध प्रकारच्या अडचणी कोणत्या तर ,जन्म सुतक किंवा मरण सुतक असते. काही वेळेस आपणास कामानिमित्त बाहेरगावी जाणार असतो, अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात. तरी आपली ही गैरसोय होऊ नये म्हणून श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे दिवंगत झालेल्या पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी घागर भरणे चा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या घागर भरणी मध्ये ज्यांना आपले नाव नोंदवायचे असते त्यांनी ज्यांच्या नावाने घागर भरायची आहे त्यांचे नाव व गोत्र आणि ३०१/- रुपये भरून आपले नाव नोंदवायचे असते. या प्रसंगी पूर्वजांच्या नावाने यज्ञात आहुती व आगारी टाकून आपल्या पितृगणांच्या मृतात्म्यास देव आणि संतांच्या साक्षीने मोक्षप्राप्तीसाठी हे पवित्र कार्य संपन्न होत असते. सदर सामूहिक घागर भरणे कार्यक्रम १० मे रोजी रोजी संपन्न होईल. ८ मे पर्यंत नावं नोंदणी करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.