Header Ads

Header ADS

आज सोम प्रदोष व्रत! 'या' शुभ मुहूर्तावर करा भगवान शंकराची पूजा; सुटतील सर्व समस्या


  आज सोम प्रदोष व्रत! 'या' शुभ मुहूर्तावर करा भगवान शंकराची पूजा; सुटतील सर्व समस्या


लेवाजगत माहिती वृत्त:- दू धर्मात प्रदोष व्रताला फार महत्त्व आहे. हा शुभ दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत पाळले जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष व्रत 20 मे रोजी म्हणजेच आज पाळण्यात येणार आहे. 

कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीपासून प्रदोष व्रत सुरू करता येते. त्याचबरोबर श्रावण आणि कार्तिक महिन्यातील त्रयोदशीपासून प्रदोष व्रत सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकते. प्रदोष व्रत केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
भगवान शकंराला प्रसन्न करण्यासाठी सोम प्रदोष व्रत हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. सोम प्रदोष व्रत मुलांच्या सुखासाठी, लवकर विवाह आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी पाळले जाते. सोम प्रदोष व्रत कसे पाळावे? पूजेचा शुभ मुहूर्त कोणता हे जाणून घेऊयात. 

सोम प्रदोष व्रत 2024 तारीख 

पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सोमवार, 20 मे रोजी दुपारी 3:58 वाजता सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, 21 मे रोजी सायंकाळी 5:39 वाजता समाप्त होईल. पण, तिथीनुसार सोम प्रदोष व्रत आज पाळले जाणार आहे.

सोम प्रदोष व्रतासाठी शुभ मुहूर्त 

प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त 20 मे रोजी संध्याकाळी 6:15 ते 7:20 पर्यंत आहे. याशिवाय मध्यान्हात म्हणजेच अभिजीत मुहूर्तावरही भगवान शिवाची पूजा करता येते.

प्रदोष व्रत पूजेची वेळ 

प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळातच भगवान शंकराची पूजा केली जाते. प्रदोष काल सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटे आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटे चालतो.

सोम प्रदोष व्रत 2024 पूजा विधि

  • प्रदोष व्रतात पूजा सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या समोर जाऊन व्रताची प्रतिज्ञा घ्या.
  • भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. 
  • यानंतर गंगाजलाने मूर्ती स्वच्छ करावी.
  • त्यानंतर देशी तुपाचा दिवा लावून मूर्तीला फुलांच्या माळांनी सजवा.
  • यानंतर मूर्तीवर चंदन आणि कुंकू लावावा.
  • भगवान शंकराला खीर, हलवा, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा.
  • यानंतर प्रदोष व्रत कथा, पंचाक्षरी मंत्र आणि शिव चालिसाचे पठण करावे.
  • संध्याकाळी प्रदोष पूजा अधिक फलदायी मानली जाते, म्हणून पूजा प्रदोष काळातच करावी.
  • उपवास करणाऱ्या व्यक्तीने सात्विक भोजनानेच उपवास सोडावा.
  • यानंतर 108 वेळा शिवाय नमः मंत्राचा जप करून हवन करावे.
  • नंतर भगवान शंकराची आरती करून दान वगैरे करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.